CBSE BOARD CLASS 12th Previous Year Question Paper
CBSE Class 12 MARATHI Previous Year exam Question Paper 2026– Free PDF Download
CBSE CLASS 12 PREVIOUS YEAR QUESTION PAPER
MARATHI - 2026
Previous Year Question paper Class 12 with Free PDF download Link
Free PDF Download Link Available in last of the question Paper / Post
Series: RQ3SP
रोल नं. / Roll No.
वेळ : 3 तास / निर्धारित समय : 3 घंटे / Time allowed: 3 hours
SET~4
प्रश्नपत्रिका कोड / Q.P. Code: 9
परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकेचा कोड उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर लिहिणे आवश्यक आहे.
Candidates must write the Q.P. Code on the title page of the answer-book. मराठी / MARATHI
एकूण गुण : 80 / अधिकतम अंक : 80 / Maximum Marks: 80
CBSC class 12th preveious year exam , cbse exam , CBSE exam paper, CBSE MARATHI exam, CBSE CLASS 12 MARATHI QUESTION PAPER 2026 - free pdf downlaod link
CBSE CLASS 12 PREVIOUS YEAR QUESTION PAPER
MARATHI - 2026
Previous Year Question paper Class 12 with Free PDF download Link
Free PDF Download Link Available in last of the question Paper / Post
मराठी / MARATHI
एकूण गुण : 80 / अधिकतम अंक : 80 / Maximum Marks: 80 नोट :
(I) प्रश्नपत्रिकेत 11 छापील पाने आहेत; कृपया तपासून घ्या.
(II) प्रश्नपत्रिकेच्या उजवीकडे छापलेला प्रश्नपत्रिकेचा कोड उत्तरपुस्तिकेच्या मुखपृष्ठावर लिहा.
(III) प्रश्नपत्रिकेत 8 प्रश्न आहेत; तपासून घ्या.
(IV) प्रश्न सोडविण्यापूर्वी उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नक्रमांक लिहा.
(V) प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका 10.15 वाजता वाटण्यात येईल. 10.15 ते 10.30 या दरम्यान परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिका फक्त वाचायची आहे; उत्तरे लिहायला सुरुवात करू नये. NOTE:
(I) Please check that this question paper contains 11 printed pages.
(II) Q.P. Code given on the right hand side of the question paper should be written on the title page of the answer-book by the candidate.
(III) Please check that this question paper contains 8 questions.
(IV) Please write down the serial number of the question in the answer-book at the given place before attempting it.
(V) 15 minute time has been allotted to read this question paper. The question paper will be distributed at 10.15 a.m. From 10.15 a.m. to 10.30 a.m., the candidates will read the question paper only and will not write any answer on the answer-book during this period. General Instructions:
• This question paper is divided into 4 Sections.
• It has total 8 questions.
Section A: 2 Question No. 1 to 2
Section B: 2 Question No. 3 to 4
Section C: 1 Question No. 5
Section D: 3 Question No. 6 to 8
Attempt questions as per specific instructions.
Write question no. in Answer Book before attempting it. सामान्य सूचना :
• ही प्रश्नपत्रिका चार विभागामध्ये विभागली आहे.
• प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न आहे.
विभाग A मध्ये प्रश्न क्र. 1 ते प्रश्न क्र. 2
विभाग B मध्ये प्रश्न क्र. 3 ते प्रश्न क्र. 4
विभाग C मध्ये प्रश्न क्र. 5
विभाग D मध्ये प्रश्न क्र. 6 ते प्रश्न क्र. 8
सूचनांनुसार प्रश्न सोडवा.
उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवण्यापूर्वी प्रश्न क्रमांक लिहा. विभाग - 'A' - वाचन व आकलन (15) पुढील गद्य उतारा वाचून त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मानवाला अवास्तव व कल्पनेपलीकडील गोष्टींची नेहमीच ओढ लागून राहिली आहे. त्या आकर्षणामुळेच अनेकदा मनुष्य जी गोष्ट मिळविणे कधी शक्यच नाही अशा गोष्टी प्राप्त करण्याचे स्वप्न पाहू लागतो. याचा परिणाम म्हणजे असे ध्येय कधी साध्य तर होतच नाही, परंतु प्रचंड नैराश्य मात्र अशा लोकांना घेरून टाकते. म्हणूनच जे ध्येय वास्तवात आहे व जे मिळविण्यासारखे आहे, असेच ध्येय ठेवावे. वर्षाच्या शेवटी वार्षिक परीक्षा होणार हे ठरलेलेच असते. त्यामुळे वर्षभराचे नियोजन करून टप्प्याटप्प्यावर स्वतःच्या क्षमता तपासून, सुधारणा करून वार्षिक परीक्षा आत्मविश्वासाने देता येते. वार्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे ध्येय गाठता येते. वार्षिक परिक्षेचा कालावधी समोर असल्यामुळे नियोजन व प्रयत्नांची योग्य सांगड घालता येते.
रोजचा अभ्यास, आठवड्याचा अभ्यास, महिन्याचा अभ्यास, वर्षाचा अभ्यास असे वेळेचे बंधन घालून टप्प्याटप्प्याने केलेला अभ्यास निश्चितच आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जातो. जे विद्यार्थी वेळेचे बंधन पाळत नाहीत, त्यांना मात्र परीक्षा तोंडावर आल्यावर प्रचंड पळापळ करावी लागते. नोट्स अपूर्ण असतात. उजळणी झालेली नसते. पुस्तकातील काही भाग समजलेलाच नसतो. लेखनाचा सराव अपूर्ण असतो. अशा अपूर्णतेच्या चक्रव्यूहात ते अडकतात व अपयश पदरी येते. ध्येयाला वेळेच बंधन असायलाच हवे.
इतरांचे बघून, इतरांनी सांगितलेले ध्येय ठरविले तर ते साध्य होईलच आणि टिकेलच अशी खात्री नाही. कारण, ते तुमच्या अंतःकरणात प्रकटलेले नसल्यामुळे असे ध्येय गाठण्यासाठी अंतःप्रेरणा तुमच्या मनात निर्माण होणार नाही. इतरांशी तुलना करून ध्येय ठरविलेले नसावे. ते आपण आपले ठरवावे. अर्थात आपल्या क्षमतांनुसार व आवडीनुसार ठरवावे. आपल्या मित्रांनी ठरविलेले त्यांचे ध्येय हे त्यांच्या इच्छेतून, त्यांच्या क्षमतांनुसार व त्यांच्या परिस्थितीनुसार ठरविलेले असेल. त्यामुळे ते ध्येय 'तुमचे ध्येय' होऊ शकत नाही.
काही विद्यार्थी जगातल्या एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या ध्येयावरून स्वतःचे ध्येय ठरवतात. मित्र किंवा मैत्रिण इंजिनिअरिंगला गेले म्हणजे आपणही जायलाच हवे, असे नाही. हे ध्येय निवडताना वरील सर्व बाबींचा विचार केला असेल आणि मनापासून तुम्हाला वाटत असेल तर असे ध्येय निवडण्यास हरकत नाही. परंतु एखादे यशस्वी व्यक्तीचे आत्मचरित्र वाचून, चित्रपटात बघून, प्रत्यक्ष भेटून तात्पुरते प्रभावित होऊन जर ध्येय ठरविले तर अपयश येण्याचीच शक्यता अधिक. कारण तो तात्पुरता प्रभाव ओसरताच तुमचा उत्साहसुद्धा मावळून जाईल. जे श्रम तुम्ही केले असतील त्याचे काय ? शिवाय अपयशाचे जे इतर तोटे होतील ते वेगळेच.
स्वतःला मनापासून काय वाटते, आपली गरज काय आहे, आपल्यात क्षमता किती आहे, साधनांची किती उपलब्धता आहे, वेळ किती आहे, हे सर्व पडताळून तुम्ही तुमचे स्वतःचेच ध्येय स्वतः ठरवा. (a) खालील प्रश्नांची योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. [3 * 1 = 3]
(I) मानवाला नेहमी कोणत्या गोष्टींची ओढ असते ?
(A) सुखाच्या
(B) अतर्क्य
(C) अवास्तव
(D) न मिळालेल्या (II) ध्येयाला कोणते बंधन असावयास हवे ?
(A) परीक्षेचे
(B) वेळेचे
(C) सरावाचे
(D) स्वप्नाचे (III) इतरांनी सांगितलेले ध्येय ठरविले तर काय होईल ?
(A) ध्येय साध्य होईल
(B) इतरांची मदत मिळेल
(C) यश मिळेल
(D) अपयश येईल (b) पुढील प्रश्नांची 15 ते 20 शब्दांत उत्तरे लिहा. [2 * 2 = 4]
(I) इतरांनी सांगितलेले ध्येय का ठरवू नये ?
(II) परीक्षा जवळ आल्यावर काही विद्यार्थ्यांची पळापळ का होते ? (c) खालील प्रश्नाचे उत्तर सुमारे 40 ते 50 शब्दांत लिहा. [1 * 3 = 3]
ध्येय ठरविताना अपयश येण्याची शक्यता केव्हा निर्माण होते ? पुढील कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कुंभारासारखा नाही गुरु रे जगात
वरि घालतो धपाटा आत आधाराला हात
आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात
कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराज्यांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत
कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात (a) खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यांयामधून निवडून लिहा. [2 * 1 = 2]
(I) कवीने श्रेष्ठ गुरू कोणाला म्हटले आहे ?
(A) देव
(B) शिक्षक
(C) निसर्ग
(D) कुंभार (II) घटाला कोणामुळे प्रतिष्ठा लाभते ?
(A) माती
(B) गुरू
(C) आकार
(D) हात (b) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. [3 * 1 = 3]
(I) कुंभार वेगवेगळ्या आकृती कशातून निर्माण करतो ?
(II) घट कोठे-कोठे वापरला जातो ?
(III) शेवटी अज्ञात कोण राहते ? विभाग - 'B' - लेखन (15) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा. (आवशक्यतेनुसार खाली दिलेल्या मुद्द्यांचा आधार घ्यावा.) [1 * 10 = 10] I. निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त
बालपण - शिक्षण - सैनिकी जीवनाचे आकर्षण - सैन्यात भरती - सैनिकी जीवन - युद्धाचा अनुभव - शौर्य - सेवानिवृत्त - आताचे जीवन - भावी पिढीकडून अपेक्षा. II. संतांचे सामाजिक कार्य
महाराष्ट्र संतांची भूमी - विविध काळातील सामाजिक परिस्थिती - अभंग, भारुडे, कीर्तनातून समाज जागृती - समतेचा संदेश - भक्ती, परोपकार, त्याग इत्यादीचे संस्कार. III. अंधश्रद्धा आणि समाज
अंधश्रद्धा पूर्वीपासूनच - निर्मितीची कारणे - अज्ञान - दारिद्र्य - उदाहरणे - बुवाबाजी - श्रद्धा. विज्ञानावर आधारित - संस्थाचे कार्य - विरोध - जागृतीची गरज. IV. प्राण्यांना बोलता आले तर .... !
प्राण्यांचे विविध प्रकार - हिंस्त्र - पाळीव इत्यादी - मानवाचे जंगलावर अतिक्रमण - शिकार - असुरक्षित जीवन - पाळीव प्राण्यांवर अत्याचार - काही प्राणी नशीबवान - माणसाचे गुणदोष सांगतील. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर अंदाजे 60 ते 70 शब्दांत उत्तर लिहा. [1 * 5 = 5]
शाळेमध्ये झालेल्या आंतरशालेय योगासन स्पर्धेच्या कार्यक्रमाचा अहवाल लिहा.
किंवा / OR
'कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या' या बातमीवर आधारित वृत्तलेख लिहा. विभाग - 'C' - व्याकरण (25) सूचनेनुसार उत्तरे लिहा. (a) पुढील शब्दांपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा. (कोणतेही तीन) [3 * 1 = 3]
I. कलाकार
(A) चित्रकार
(B) नर्तक
(C) कलावंत
(D) नट II. सवलत
(A) सुटका
(B) मुभा
(C) सोय
(D) संधी III. तृण
(A) पान
(B) वृक्ष
(C) गवत
(D) शेवाळे IV. असूया
(A) दुःख
(B) द्वेष
(C) हेवा
(D) निरर्थक (b) पुढील सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा. (कोणतेही दोन) [2 * 2 = 4]
I. खालील वाक्यातील अधोरेखित सामासिक शब्दाचा समास ओळखा.
मनोरंजन ही माणसाची गरज आहे.
(A) द्विगू समास
(B) तत्पुरुष समास
(C) अव्ययीभाव समास
(D) द्वंद्व समास II. मानधन
(A) द्वंद्व समास
(B) द्विगू समास
(C) कर्मधारय समास
(D) अव्ययीभाव समास III. नवरात्र
(A) कर्मधारय समास
(B) द्वंद्व समास
(C) तत्पुरुष समास
(D) द्विगू समास IV. खालीपैकी कोणता शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
(A) विटीदांडू
(B) लोकप्रिय
(C) पावलोपावली
(D) दशदिशा (c) पुढील वाक्यांचा सूचनेनुसार प्रयोग ओळखा किंवा बदला. (कोणतेही तीन) [3 * 2 = 6]
I. रजनीने सुधाला बोलाविले.
(या वाक्याचा प्रयोग ओळखा.)
(A) कर्मणी प्रयोग
(B) भावे प्रयोग
(C) कर्तरी प्रयोग
(D) कर्म-कर्तरी प्रयोग II. कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
(A) शीला पुस्तक वाचते.
(B) अमिताने गावी जावे.
(C) पारध्याने शिकार केली.
(D) सागर अभ्यास करतो. III. तुम्ही चित्र काढले. (कर्मणी प्रयोग करा)
IV. माझ्याकडून पाणी प्यायले जाते. (कर्तरी प्रयोग करा) (d) वाक्य प्रकार ओळखा किंवा सूचनेनुसार वाक्य प्रकार बदला. (कोणतेही तीन) [3 * 2 = 6]
I. संगीता परिक्षेत पास झाली नाही.
याचे होकारार्थी वाक्य असेल -
(A) संगीता परिक्षेत नापास झाली नाही.
(B) संगीता परिक्षेत पास झाली.
(C) संगीता परिक्षेत नापास झाली.
(D) संगीता परिक्षेत नापास झाली नाही असे नाही. II. बक्षीस मिळाल्यावर प्रत्येकाला आनंद होतो.
याचे प्रश्नार्थक वाक्य असेल -
(A) बक्षीस मिळाल्यावर प्रत्येकाला का आनंद होतो ?
(B) बक्षीस मिळाल्यावर प्रत्येकाला आनंद का होत नाही ?
(C) बक्षीस मिळाल्यावर कोणाला आनंद होत नाही ?
(D) बक्षीस मिळाल्यावर प्रत्येकाला कोठे होतो आनंद ? III. लोकहो, मतदानाचा हक्क बजावा. (वाक्याचा प्रकार ओळखा)
IV. मी रोज सकाळी व्यायाम करते. (वाक्याचा प्रकार ओळखा) (e) पुढे काही वाक्ये दिलेली आहेत. अधोरेखित शब्दांऐवजी कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य वाक्प्रचार निवडून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही तीन) [3 * 2 = 6]
(डोळा न लागणे, खल करणे, गाफिल असणे, फितूर होणे, पारखे होणे)
I. लाऊडस्पीकरवरील मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे दुपारी मला झोप लागली नाही.
II. नवीन घराला कोणता रंग द्यावयाचा यावर त्यांनी बरीच चर्चा केली.
III. आपल्याच सैन्यातील लोकांनी दगाबाजी केल्यामुळे आपला पराभव झाला.
IV. नोकरीसाठी बराच काळ दूर राहिल्यामुळे त्याला आईचे प्रेम मिळाले नाही. विभाग - 'D' - गद्य-पद्य पाठ आणि उपयोजित लेखन (25) गद्य पाठाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (a) योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) [2 * 1 = 2]
I. एकदा ......... कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र 'नाही आनंदा तोटा' अशी अवस्था होते.
(A) फायदा
(B) पैसा
(C) सुगंध
(D) आनंद II. स्वतः ला ......... म्हणवून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा.
(A) हुशार
(B) सुंदर
(C) शिंव्ह
(D) पैलवान III. बापू गुरुजींनी गावात ......... आणण्यासाठी खूप प्रयत्न केले.
(A) शाळा
(B) दवाखाना
(C) पोस्ट
(D) कॉलेज (b) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 30 ते 40 शब्दांत लिहा. [2 * 2 = 4]
I. दंतवैद्याने लेखकाचा काढलेला दात दाखविल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये कोणते विचार आले ?
II. पहाटेचे आणि पाखरांचे नाते लेखकाने कोणत्या शब्दांत वर्णन केले आहे ?
III. गुरुजींच्या गावामध्ये हळूहळू कसा बदल होत गेला, ते थोडक्यात सांगा.
IV. कारगीलला जाण्यासाठी लेखिकेने कोणता मुहूर्त निश्चित केला व का ? (c) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 70 ते 75 शब्दांत लिहा. [2 * 3 = 6]
I. पुलावर उभा असलेल्या सैनिकाचा लेखिकेला कोणता अनुभव आला ?
II. निसर्गातील आनंदाचे वर्णन लेखकाने कोणत्या शब्दांत केले आहे ?
III. पहाटेच्या वेळी लेखकाला बागेतील फुलांचा कोणता अनुभव येतो ? (a) पद्य पाठांच्या आधारे योग्य पर्याय निवडून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) [2 * 1 = 2]
I. संत एकनाथांनी मनुष्याला ......... म्हटले आहे.
(A) विंचू
(B) वृश्चिक
(C) कामक्रोध
(D) इंगळी II. नाही फुलं ग, ....... तोडते.
(A) देह
(B) सोन्याची फुले
(C) ऊस
(D) झेंडू III. गुंतूनी गुंत्यात साऱ्या ........ माझा मोकळा.
(A) हात
(B) पाय
(C) श्वास
(D) प्राण (b) कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 35 ते 40 शब्दांत लिहा. [2 * 2 = 4]
I. बा.भ. बोरकरांना आषाढघनाच्या पाऊलखुणा कोठे-कोठे दिसतात ?
II. आरश्यातील स्त्री अधिकारवाणीने काय म्हणाली ?
III. शेतकरी स्त्रिच्या कष्टमय जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (c) पुढीलपैकी एका काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 60 ते 70 शब्दांत लिहा. [1 * 4 = 4]
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरून बघती पुन्हा पुन्हा
किंवा
तमोगुण मागे सारा
सत्त्वगुण लावा अंगारा ! पुढील प्रश्नांचे 50 ते 60 शब्दांत उत्तर लिहा. [1 * 3 = 3]
माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करा.
किंवा
मुलाखत घेण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते ते थोडक्यात सांगा.
Marathi Question Paper CBSE Class 12 Free PDf Download Link
Manipuri Question Paper CBSE Class 12 -With Free PDF download Link
Malayalam Question Paper CBSE Class 12 - WIth Free PDF download Link
CBSE Class 12 Legal Studies Question paper - Free PDF download link